Radhika Apte | अभिनेत्री राधिका आपटेने बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये देखील उत्तम काम करत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेकदा राधिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली आहे. नुकतीच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर सध्या राधिका आईपणाचा आनंद घेत आहे. मात्र आता अभिनयासह राधिका लवकरच एक नवीन सुरुवात करणार आहे. अभिनेत्री राधिका आपटे आता दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ती ‘कोट्या’ या ॲक्शन चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून या चित्रपटाची घोषणा सिनेव्हेश्चर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (CIFF) च्या सिने व्ही सीएचडी मार्केट लाईनअपमध्ये करण्यात आली. ‘कोट्या’ चित्रपटाची निर्मिती विक्रमादित्य मोटवानी करत आहेत. ‘कोट्या’ हा चित्रपट हिंदी/मराठी असणार आहे. ‘कोट्या’ हा ॲक्शन-फँटसी सिनेमा असणार आहे. चित्रपटात ऊसतोड तरुणाची गोष्ट सांगण्यात येणार आहे, ज्याला बळजबरीने केलेल्या एका वैद्यकीय प्रक्रियेनंतर काही शक्ती मिळतात. ज्याचा वापर तो कुटुंबावरील कर्ज उतरवण्यासाठी करतो. Radhika Apte | राधिका आपटेच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तिने 2009 साली ‘घो मला असा हवा’ या मराठी सिनेमात काम केलं होतं. नंतर तिने ‘पॅडमॅन’, ‘मांझी’, ‘अंधाधुन’, ‘विक्रम वेधा’, ‘कबाली’, ‘पार्च्ड’, ‘हंटर’, ‘लस्ट स्टोरीज’ या हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. ‘सिस्टर मिडनाईट’ या हॉलिवूड सिनेमात ती शेवटची दिसली. कान्समध्येही या सिनेमाचं प्रीमिअर पार पडलं होतं. Radhika Apte | राधिका आपटेने 2012 रोजी बेनेडिक्ट टेलरशी लग्नगाठ बांधली. बेनेडिक्ट टेलर हा ब्रिटिश व्हायोलिस्ट आहे. लग्नाच्या 12 वर्षांनी बेनेडिक्ट आणि राधिका आई-बाबा झाले आहेत. आई झाल्यानंतर आता राधिकाने दिग्दर्शन क्षेत्रात पदापर्ण करण्याचा निर्णय घेतला असून चाहते देखील तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. Radhika Apte | हेही वाचा: “आम्हाला एक खून माफ करा”; रोहिणी खडसेंनी राष्ट्रपतींना पत्र लिहीत का केली अशी मागणी?