Actress Radhika Apte | बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटेने एका कार्यक्रममध्ये हजेरी लावत सर्वांना आश्चर्यचकित केले होते. राधिकाने लंडन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर येताच ती गरोदर असल्याचे समजले होते. तिच्या बेबी बंपमुळे तिच्या गरोदरपणाची बातमी सर्वांना समजली. यानंतर राधिकाने एक आठवड्यापूर्वीच बाळाला जन्म दिला आहे. तिने तिच्या बाळाची पहिली झलक सोशल मीडियाद्वारे दाखवली आहे.
राधिका आपटेने दोन महिन्यापूर्वी बेबी बंप फ्लाँट करून तिच्या घरी नवीन सदस्याचं आगमन होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. राधिका आपटेने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. तिने तान्ह्या बाळासोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती लॅपटॉपवर काम करत बाळाला ब्रेस्टफीडिंगही करत आहे. या गोड फोटोसोबत राधिकाने ‘बाळाच्या जन्माच्या एका आठवड्यानंतर माझी पहिली वर्क मीटिंग,’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
View this post on Instagram
तिने दिलेल्या कॅप्शनुसार तिचं बाळ एका आठवड्याचं झालं आहे, हे समजते. राधिका या फोटोमध्ये खूप आनंदी दिसत असून तिने मुलगा की मुलीला जन्म दिला आहे, हे मात्र अद्याप समजू शकले नाही.
दरम्यान, राधिका तिचं वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियापासून दूर ठेवते. राधिकाने तिच्या लग्नाची माहितीही बराच काळ लपवून ठेवली होती. तिने 2012 मध्ये ब्रिटीश व्हायोलिन वादक आणि लोकप्रिय संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या 12 वर्षानंतर आई होणार असल्याची माहितीही तिने सांगितली नव्हती. मात्र आता राधिका आणि बेनेडिक्ट आई-बाबा झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा:
दिल्लीच्या अनेक शाळांना आज पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी ; आठवड्यातील तिसरी धमकी