दिल में है ज़रा सा ग़म ……लालू यादव यांच्या विरहात राबडी देवींनी रचली कविता

नवी दिल्ली – देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आहे. सर्वपक्षीय नेते आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारात व्यस्त आहेत. पण बिहारचा राष्ट्रीय जनता दल मात्र याला अपवाद ठरत आहेत.

एकेकाळचे बिहार राज्याच्या राजकारणाचे केंद्र असलेले राष्ट्रीय जनता दल पक्षाचे लालू प्रसाद यादव जेलमध्ये आहेत तर मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांनी बंडाचं निशाण फडकावत ‘लालू-राबडी’ या आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे. या सगळ्यामुळे हताश आणि निराश झालेल्या लालू यादव यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी लालू यादव यांच्या विरहातून एक कविता रचली असून त्यांनी ती सोशल माध्यमावरील ट्विटरवर पोस्ट केली आहे.

या कवितेतून राबडी देवी यांनी लालू यांच्या आठवणींना उजाळा देत स्वतला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल देखील केला आहे. तसेच राबडी देवी यांनी पोस्ट केलेली ही कवीता लालू प्रसाद यादव यांनीही आपल्या ट्विटर खात्यावर शेअर केली आहे.

नैना थोड़े हैं नम
दिल में है ज़रा सा ग़म
पर हिम्मत न टूटी
न हुआ है हौसला कम

बड़बोले पापी को
लाएंगे ज़मीन पर हम
इस साज़िश का बदला
बदलाव से लेंगे हम

कोई कैसे करेगा जुदा
कोई कैसे करेगा जुदा
जीवन में लालू है
जन जन में लालू है
कण कण में लालू है
हर मन में लालू है

Leave A Reply

Your email address will not be published.