R Vaishali : बुद्धीबळपटू ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदाची बहीण आर वैशाली (R Vaishali ) हिने सध्या सुरू असलेल्या फिडे महिला कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. वैशालीने विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला आहे. चेन्नईच्या २४ वर्षीय वैशालीने बुधवारी पार पडलेल्या अखेरच्या १४व्या फेरीमध्ये रशियाच्या कॅटरीना लॅगनो हिला पराभूत करीत ८.५ गुणांची कमाई केली. हे जेतेपद मिळवणारी ती पहिली भारतीय महिला बुद्धिबळ खेळाडू ठरली असून, तिने जागतिक अजिंक्यपद (वर्ल्ड चॅम्पियनशिप) स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे. R Vaishali जागतिक चॅम्पियनशिपच्या लढतीसाठी गेल्या १५ वर्षांत ती पात्र ठरणारी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. तिच्या या यशाने भारतीय बुद्धिबळाच्या सुवर्णयुगाची पुन्हा सुरुवात झाली आहे. R Vaishali R Vaishali : आर वैशालीने रचला इतिहास; ठरली पहिली भारतीय महिला बुद्धिबळ खेळाडू या निकालामुळे बुद्धिबळाच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदाच एखादी भारतीय महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या किताबासाठी लढणार आहे. तिच्याआधी कोनेरू हम्पीने २०११ मध्ये अल्बेनियातील तिराना येथे हौ यिफानविरुद्ध महिलांच्या किताबासाठी आव्हान दिलं होतं. कोनेरू हम्पीनंतर आता आर वैशाली गेल्या १५ वर्षांत ही कामगिरी करणारी पहिली खेळाडू ठरली. आता भारताची ८४ वी ग्रँडमास्टर वैशाली आणि चीनची जू वेनजुन यांच्यातील हा महामुकाबला या वर्षाच्या अखेरीस पार पडेल. बुद्धिबळ प्रेमी आतापासूनच या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. (R Vaishali) हेही वाचा: Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी ; सेन्सेक्स ४६५ अंकांनी तर निफ्टी १११ अंकांनी वधारला