आर माधवनचा बहुचर्चित रॉकेट्री आता घरबसल्या पाहता येणार,’या’ OTT वर हिंदीत झाला रिलीज

मुंबई – आर. माधव सध्या रॉकेट्री: द नंबी इफेक्ट या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः माधवनने केले आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा चित्रपट 1 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट दक्षिणेकडील भाषांमध्ये OTT प्लॅटफॉर्मवर आधीच प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाची हिंदी आवृत्तीही ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे.
या OTT वर रॉकेट्री रिलीज
आर. माधवनच्या रॉकेट्री: द नंबी इफेक्टची हिंदी आवृत्तीही ओटीटीवर रिलीज झाली आहे. चित्रपटाची हिंदी आवृत्ती वूट सिलेक्टवर प्रदर्शित झाली आहे. यापूर्वी हा चित्रपट दक्षिण भारतीय भाषांमध्ये ओटीटीवर लॉन्च करण्यात आला. अॅमेझॉन प्राइमवर हा चित्रपट दक्षिण भाषांमध्ये उपलब्ध आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच आर. माधवनने यात मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनाही आवडला होता.
माधवन चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीबद्दल उत्सुक आहे
माधवन या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीबद्दल खूप उत्सुक आहे. ओटीटीवर हिंदी आवृत्ती आल्याने हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. या चित्रपटाबद्दल आर. माधवनने सांगितले की, ही एक अशी कथा आहे जी संपूर्ण जगाला दाखवण्याची गरज आहे.त्यामुळे लवकरच हा चित्रपट कलर्स सिनेप्लेक्स वाहिनीवर देखील प्रसारित होणार आहे.





