ब्रह्म सेवा संघातर्फे प्रा. संपत गर्जे यांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान

पिंपरी – ब्रह्म सेवा संघाच्या वतीने यावर्षीचा “गुणवंत शिक्षक पुरस्कार’ भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते प्रा. संपत गर्जे यांना प्रदान करण्यात आला. निगडी येथील स्वा. सावरकर सभागृहात पुरस्कार सोहळा आयोजित कराण्यात आला होता. यावेळी ज्ञान प्रबोधिनी केंद्रप्रमुख वा. ना. अभ्यंकर, बह्मह सेवा संघाचे मकरंद बापट, संयोजक राजन लाखे, प्रा. संतोष पाचपुते, उद्योगपती हंसराज पाटील, सतीश आचार्य, शब्दघनचे डी. बी. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. संपत गर्जे हे भारतीय जैन संघटना संचालित माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, संत तुकारामनगर, पिंपरी या विद्यालयात गेली 25 वर्षे “मराठी’ विषयाचे अध्यापन करीत आहेत. विद्यार्थी प्रिय शिक्षक प्रा. संपत गर्जे हे संत साहित्याचे अभ्यासक असून त्यांची प्रवचनकार म्हणून फार मोठी ख्याती आहे. तसेच साहित्य, समाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे फार मोठे कार्य असून ते एक उत्कृष्ट कवी आहेत. महाराष्ट्रामध्ये ते अनेक शैक्षणिक व विषयावर व्याख्याने व प्रवचने देतात. सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.