Badminton : पी. व्ही. सिंधूला मिळणार हाशिम यांचे प्रशिक्षण
Updated On:

नवी दिल्ली – भारताची दोनवेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने माजी ऑल इंग्लंड विजेते मलेशियाचे महंमद हाफीज हाशिम यांचे मार्गदर्शन घेण्याचे निश्चित केले आहे.
पुढील वर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्यासाठी हाशिम यांच्या प्रशिक्षणाचा लाभ होइल, असा विश्वास सिंधूने व्यक्त केला आहे.
हाशिम हे प्रशिक्षक मिळवण्याकरता सिंधूने भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साई) पत्र लिहिले आहे.
सिंधू ही एलिट खेळाडू आहे आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताकडून आतापर्यंत पात्र ठरलेली ती एकमेव महिला खेळाडू आहे, त्यामुळे तिची मागणी साई मान्य करेल, असा विश्वास माजी राष्ट्रीय प्रशिक्षक विमल कुमार यांनी व्यक्त केला.





