BWF World Championships : पी.व्ही. सिंधूची ‘या’ कारणामुळे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार
Updated On:

नवी दिल्ली – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू डाव्या घोट्याच्या स्ट्रेस फ्रॅक्चरच्या दुखापतीमुळे आगामी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेला मुकणार आहे.
बर्मिंगहॅममध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले होते. मात्र, याच स्पर्धेत तिला सातत्याने डाव्या घोट्याला झालेल्या दुखापतीने सतावले होते.
जागतिक स्पर्धा टोकियो येथे येत्या रविवारपासून सुरू होणार आहे. 2019 सालच्या स्पर्धेत तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूने महिला एकेरीत स्पर्धेच्या इतिहासातील आपले पहिलेच सुवर्णपदक जिंकले होते.





