पीव्ही सिंधू आयओसीची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर

नवी दिल्ली – माजी विश्‍वविजेती आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पीव्ही सिंधू आणि जागतिक क्रमवारीत अकराव्या स्थानी असलेल्या कॅनडाची खेळाडू मायकल ली यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) “बिलीव्ह इन स्पोर्टस’ अभिनयासाठी ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून नेमणूक केली आहे.

याबाबत जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) सोमवारी माहिती दिली आहे. सिंधू आणि मायकल गतवर्षी एप्रिलपासून “आय एम बॅडमिंटन’ या अभियानासाठी जागतिक ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून काम करत आहेत.

यासंदर्भात सिंधू म्हणाली, आयओसीने राजदूत म्हणून मला नामांकित करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बात आहे. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीची किंवा स्पर्धेत होणारी छेडछाड करण्याच्या विरोधात मी माझ्या सहकारी खेळाडूंच्या बाजूने उभी राहणार आहे. यासाठी आम्ही एकत्रितपणे आणखी मजबूत होऊ, असे तिने म्हटले आहे.

सिंधूचे कौतुक करत बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस अजय सिंघानिया म्हणाले, सिंधूने तिच्या क्रीडाकाळात समर्पित आणि खेळलेल्या खेळाबद्दल तिच्या प्रामाणिकपणा, सरस खेळ आणि प्रामाणिकपणा याची ओळख आहे. जागतिक स्तरावर या प्रतिष्ठित सन्मानासाठी तिची निवड झाल्याने अत्यंत आनंद आणि अभिमानही वाटत असत्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या मोहिमेचा एक भाग म्हणून सिंधू आणि ली बॅडमिंटन ऍथलिट समुदायासह ऑनलाइन वेबिनार आणि सोशल मीडिया संदेशांद्वारे खेळांमध्ये होणाऱ्या जोखमींवर प्रकाश टाकण्यासाठी आणि स्पर्धेत होणाऱ्या गैरवर्तनात स्वतःचे रक्षण आणि संरक्षण कसे करावे याविषयी प्रशिक्षण देणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.