All England Open 2024 (Badminton) : प्रणोय,आकर्षीचे आव्हान संपुष्टात…

All England Open Badminton Championships 2024 : – ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत एकीकडे पी. व्ही. सिंधूने दुसरी फेरी गाठली असली तीरी ज्यांच्यावर जास्त भर होता त्या एच. एस. प्रणोय व आकर्षी कश्यप यांना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.
पुरुषांच्या एकेरीत एच. एस. प्रणोय याला सु ली यांग याच्याकडून तीन गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला. प्रणोय याने पहिला गेम 21-14 असा जिंकत आघाडी मिळवली होती. त्यानंतर मात्र यांग याने थाटात पुनरागमन करताना 21-13,21-13 अशी बाजी मारली. प्रणोय याने हा सामना तब्बल एक तास व सात मिनिटे लढत देऊनही गमावला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/all-england-badminton-championships-pv-sindhu-reaches-second-round/
पी. व्ही. सिंधू हिला आगेकूच करता आली असली तरी महिला एकेरीत अन्य भारतीय खेळाडूंना पराभवाला सामोरे जावे लागले. आकर्षी कश्यप हिचे आव्हान संपुष्टात आले. पेई यू पो हिने आकर्षीवर 21-16,21-11 असा दोन गेममध्ये विजय मिळवला. तिने आकर्षीवर 37 मिनिटांत मात केली.




