रशियाला नव्हे, राष्ट्राध्यक्षांनाच हवय युद्ध ! पुतीन यांच्या मित्राच्या लेकीची टीका

किव्ह : रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. युक्रेनने देखील रशियाला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. मात्र या देशांमधील युद्धाला जगभरातून विरोध होतोय. युक्रेनने प्रतिकार सुरू केला असून खुद्द युक्रेनला देखील युद्ध नकोय. मात्र रशिया आक्रमकतेने युक्रेनवर हल्लाबोल करत आहे. मात्र रशियातील अनेक नागिरिकांना युद्ध नकोय.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर रशियन नागरिकच चिडले आहेत. पुतीन यांच्या मित्राच्या मुलीनेही त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. सोफिया अबरामोविक असं या तरुणीचं नाव आहे. तिचे वडील रोमन अबरामोविक हे चेल्सी या प्रसिद्ध फुटबॉल क्लबचे मालक आहेत.
सोफिया आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पुतीन यांच्यावर टीका करणारे मीम पोस्ट केले आहे. रशियाच्या नावाखाली असलं तरी फक्त पुतीन यांनाच हे युद्ध हवं आहे. रशियाचा कुठलाही नागरिक या युद्धाचं समर्थन करत नाही. त्यामुळे रशिया पुतिन यांच्यासोबत असलेला जो अजेंडा राबवण्यात येतोय तो चुकीचा आहे, अशी टीका सोफिया हिने केली आहे.





