Pune : चुकून रिव्हर्स गिअर टाकला अन् पार्किंगमधून गाडी थेट…; विमानगरमधील ‘या’ भागात नेमकं काय घडलं?

पुणेः शहरातील विमानगर भागात एक विचित्र अपघाताची घटना घडली आहे. येथील शुभम अपार्टमेंटमध्ये गाडी रिव्हर्स घेताना अंदाज न आल्याने अपघाताची घटना घडली आहे. या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरून पार्किंगमधून जमिनीवर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गाडी रिव्हर्स घेताना अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील विमानगर भागातील शुभम अमार्टमेंट आहे. या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या पार्किंगमध्ये गाडी मागे घेताना चालकाला अंदाज न आल्याने गाडी जमिनीवर कोसळली. यामध्ये वाहन चालकाला जोरदार झटका बसला आणि तो मागच्या सीटवर फेकला गेला. सुदैवाने या विचित्र अपघाताच्या घटनेत जीवितहानी झाली नाही.
गाडी खाली जमिनीवर कोसळताच मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून वाॅचमनसह इमारतीमधील रहवासी यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने गाडीतून चालकाला बाहेर काढले. या अपघातामध्ये गाडीचे किरकोळ नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.





