Allu Arjun Arrest : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला अखेर अटक; काय आहे नेमके प्रकरण?

साऊथचा सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संध्या थिएटर प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण नेमके काय आहे? त्याबाबद्दल जाणून घेऊयात…
4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान, थिएटरमध्ये झालेल्या गोंधळात एका 35 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेत अनेक लोकांना दुखावत झाली. यात त्या महिलेच्या आठ वर्षांच्या मुलाला देखील दुखापत झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यानंतर पोलिसांनी या घटनेसाठी अल्लू अर्जुन आणि थिएटरचं सगळं काम सांभाळणाऱ्यांवर तक्रार दाखल केली होती.
या चेंगराचेंगरीत ज्या महिलेचा मृत्यू झाला होता त्या महिलेचे नाव रेवती असल्याचं म्हटलं जात आहे. या महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध 4 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. अखेर आता या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक अटक करण्यात आली आहे.
कोर्टाने याचिका फेटाळली
अल्लू अर्जुनने एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. तसेच, याचिका निकाली निघेपर्यंत अटकेसह पुढील सर्व कारवाईला स्थगिती देण्याचे आवाहन केले होते. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळली. त्यामुळे पुष्पाराजला अखेर पोलिसांसमोर झुकावंच लागलं.





