satara | पुसेगाव पोलीस ठाण्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक
Updated On:

पुसेगाव, (प्रतिनिधी) – एप्रिल 2024 मधे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील अधिकारी व अंमलदार यांना प्रशंसापत्र देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये ऑनलाईन कामकाजात पुसेगाव पोलीस ठाण्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला.
पुसेगाव पोलीस ठाण्यातील अंमलदार अमृता चव्हाण या सीसीटीएनएस या ऑनलाईन प्रकल्पाचे काम करीत आहेत. त्यांनी माहे एप्रिल 2024 पुसेगाव पोलीस ठाणेस घडलेले सर्व गुन्हे व त्यासंबंधी सर्व कागदपत्रे ऑनलाईन केली असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामधून पुसेगाव पोलीस ठाणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
त्याबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स. पो. नि आशिष कांबळे व अंमलदार अमृता चव्हाण यांना प्रशंसापत्र देवून सन्मानित केले आहे. या सन्मानाबद्दल पुसेगाव परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.





