पुसेगाव, (प्रतिनिधी) – भविष्यात उच्च पदावर असताना देखील त्यांच्यात सेवाभाव व समाजाप्रती जिव्हाळ्याची भावना दिसायला हवी याच उद्देशाने संस्थेच्या व अचिव्हर्स करिअर फाऊंडेशनच्या माध्यमातून येथील श्री हनुमानगिरी हायस्कूल येथे फाऊंडेशन कोर्स सुरु करण्यात आला असून या संस्थेतून आदर्श डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी घडतील. हा पुसेगाव पॅटर्न सर्वांना आदर्श ठरेल, असे प्रतिपादन डॉ. सुरेशराव जाधव यांनी केले. येथील श्री हनुमानगिरी हायस्कूल येथे फाऊंडेशन कोर्स सुरु करण्यात आला असून या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. सुरेशराव जाधव म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी मूळताच बुद्धीमान असतात त्यांना गरज असते. योग्य वेळी दर्जेदार शिक्षण मिळण्याची. शैक्षणिक संस्थातून त्यांची ज्ञानाची भूक भागायला हवी. त्याच्यांत सकारात्मकता निर्माण व्हायला हवी. यावेळी अचिव्हर्स करिअर फाऊंडेशनचे प्रा . श्री शशिकांत मोरे यांनी कोर्सचे महत्व विषद केले. प्रा . श्री पंकज घनवट यांनी प्रास्ताविक केले . कार्यक्रमास बाळासाहेब जाधव, मोहनराव जाधव, सुभाषराव जाधव, विश्वनाथ जाधव, प्रा. सौ. प्रियांका मोरे, प्राचार्य डी. एन. गोफणे, अशोक वळवी, प्रा. सौ. हेमलता खुस्पे, देशमूख, सौ. शोभाराणी लाड, जगदीश कुचेकर, शिक्षक, विद्यार्थी पालक उपस्थित होते पर्यवेक्षक आर. एन. जाधव यांनी आभार मानले. सौ अमृता जाधव यांनी सूत्रसंचालन केले.