Pune District : पुणे जिल्हा बँकेच्या एलटीएसबी बाँडची खरेदी
Pune District : जिल्हा बँकेच्या वाल्हे शाखेच्या कार्यक्षेत्रातील विविध कार्यकारी सोसायट्याकडून योजनेत गुंतवणूक केली आहे. वाल्मिकी व भैरवनाथ विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेत बाँड खरेदीबाबत चर्चा केली.

वाल्हे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एलटीएसबी बाँड योजनेला, वाल्हे व दौंडज येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रत्येकी १० लाख रुपयांची गुंतवणूक केली. वाल्हे (ता. पुरंदर) येथील वाल्मिकी विविध कार्यकारी विकास सोसायटी व दौंडज येथील भैरवनाथ विविध कार्यकारी विकास सोसायटी यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एल.टी.एस.बी. (पीडीआय) बाँड योजनेअंतर्गत, प्रत्येकी १० लाख रुपयांची गुंतवणूक केली. बँकेच्या आकर्षक व्याजदरामुळे योजनेला विविध कार्यकारी सोसायट्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हा बँकेच्या वाल्हे शाखेच्या कार्यक्षेत्रातील विविध कार्यकारी सोसायट्याकडून योजनेत गुंतवणूक केली आहे. वाल्मिकी व भैरवनाथ विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेत बाँड खरेदीबाबत चर्चा केली. दरम्यान, संस्थेची आर्थिक स्थिती आणि बँकेकडून देण्यात येणारा आकर्षक व्याजदर विचारात घेऊन दोन्ही सोसायटीच्या संचालक मंडळाने प्रत्येक सोसायटीचे १० हजार रुपयांचे १०० बाँड असे दोन्ही सोसायट्याचे मिळून, २०० बाँड खरेदी करून दोन्ही सोसायट्यांकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास एकमताने मंजुरी दिली होती.
यावेळी शाखाधिकारी संतोष दुर्गाडे यांनी वाल्मिकी सोसायटीचे चेअरमन मदन भुजबळ, भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन प्रताप इंदलकर व संचालक मंडळाकडे बॉण्ड सुपूर्द केले.
यावेळी वाल्हे शाखाप्रमुख संतोष दुर्गाडे, विकास अधिकारी मयुर भुजबळ, रोखपाल तरन्नुम आतार, अनिल पवार, महेश पवार, अभिजित पवार, मकरंद चव्हाण, विकास भुजबळ, सोसायटीचे सचिव राहुल जाधव, संस्था सभासद किसन जाधव आदींसह संचालक मंडळ उपस्थित होते. वाल्हे शाखेचे शाखाप्रमुख संतोष दुर्गाडे यांनी आभार मानले.





