प्रभात वृत्तसेवा नायगाव – पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नायगाव येथे पौष पौर्णिमेनिमित्त भाविकांनी श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे पांडेश्वर येथून ग्रामस्थांनी आणलेल्या कऱ्हेच्या पाण्याने श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांना स्नान घालण्यात आले. यावेळी सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरीची महापूजा करण्यात आली. गणेश जगताप (सासवड) यांच्या सौजन्याने हभप राम महाराज राक्षे (बारामती) यांच्या किर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला. त्यांना गायन साथ आबा महाराज बोरकर, कदम , कोलते महाराज व मृदुंग साथ तेजस खेसे यांनी दिली. भजन साथ नायगाव भजनी मंडळाने दिली. श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची आकर्षक महापूजा पुजारी माऊली जगताप यांनी केली. अन्नदान पोपट होले, नामदेव होले (उंड्री), लिलावती जगताप, गणेश जगताप, शंकर होले (सासवड), काळूराम वाळके, सोमनाथ वाळके, वैभव वारघडे, चंद्रकांत वाळके, जालिंदर वाळके, सागर वाळके (पेरणे), सुदाम फुलारे, रघुनाथ होले (हडपसर), विजय काळखैरे (सुपा), दत्तात्रय वाडकर (लोणी काळभोर), धनश्री गजरे (बुर्केगाव), लता मगर (पानवडी), दत्तात्रय बोत्रे (यवत) यांच्या वतीने करण्यात आले. मंदिर परिसराची स्वच्छता, वीज, पाणी, दर्शनबारी आदींची व्यवस्था सिध्देश्वर देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने केल्याचे राहुल कड यांनी सांगितले. देव शिकारीला जाणार असल्याने पुढील पौर्णिमेपर्यंत मंदिरातील महाप्रसाद व प्रसाद लावणे बंद राहणार आहे.