Purandar Fort – पुरंदर तालुक्यातील किल्ले पुरंदरवर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त शंभू जन्मोत्सव सोहळा थाटात पार पडला. यावेळी पुरंदर किल्ला शंभू भक्तांनी फुलला होता. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन, जन्मोत्सव पाळणा, शिवकालीन मर्दानी खेळ, घोडेस्वारीचे प्रात्यक्षिक, शंभुराजे महानाट्य आदी उपक्रमांनी लक्ष वेधून घेतले. पुरंदर प्रतिष्ठान व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभाग, पंचायत समिती यांच्या वतीने दि. १३ व १४ मे रोजी ऐतिहासिक किल्ले पुरंदर येथे भव्य शिवपुत्र शंभू जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सोहळ्यास शिवशंभू भक्तांची गर्दी ओसंडून वाहत होती. यावेळी पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे यांनी प्रतिष्ठानच्या वतीने शंभूभक्तांचा सन्मान केला. दोन दिवसीय सोहळ्याची सुरुवात (दि. १३) सायंकाळी ६ वाजता श्रीक्षेत्र नारायणपूर येथील प. पू. पोपट महाराज टेंबे स्वामी यांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व ज्योत प्रज्वलनाने करण्यात आली. किल्ले पुरंदर येथे कार्यक्रमास प्रारंभ सायंकाळी ७ वाजता करण्यात आला. यावेळी पुरंदर गडावर शंभुराजे महानाट्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, ज्योती घेऊन येणाऱ्या मंडळांचे स्वागत करण्यात आले. महाप्रसादाचे आयोजन केले होते. गुरुवारी (दि. १४) सकाळी ७ वाजता पुरंदरेश्वर, केदारेश्वर, शिवरायांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. सकाळी ८ वाजता स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव पाळणा, शिक्षण विभागाच्या महिलांनी पार पडला. किल्ले पुरंदर. हा सोहळा प्राथमिक शिवकालीन मर्दानी खेळ, घोडेस्वारीचे प्रात्यक्षिक सकाळी ९.३० वाजता जिल्हा परिषदेचे सभापती, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य, अधिकारी, शिवशंभू भक्त व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. सकाळी १० वाजता मुख्य शासकीय कार्यक्रमांतर्गत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले. व्याख्यान व पोवाड्यांने अंगावर शहारे सकाळी ११ वाजता ढोल- ताशा गजर, लेझीम पथक, शिवकालीन मर्दानी खेळ, घोडेस्वारी प्रात्यक्षिक, रक्तदान शिबिर, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान व पोवाड्यांचा कार्यक्रम सादर झाला. दिवसभर सर्व शिवभक्तांसाठी पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था केली होती. यावेळी शिक्षक संघ, पंचायत समिती, तळागाळातील संघटना, संभाजी ब्रिगेड यांचा सहभाग होता. कार्यक्रमादरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिरही आयोजित केले होते. तर दिवसभर शिवभक्तांनी संभाजी महाराजांना अभिवादन केले, बऱ्याच शंभूभक्तांनी पालख्याही आणल्या होत्या. लोकप्रतिनिधींची केविलवाणी अनास्था छत्रपती संभाजी महाराज यांची शासनाने शासकीय जयंती साजरी करण्याचे फक्त कागदोपत्रीच राहिली असून या सोहळ्याकडे सर्वच राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष राहिलेले आहे. दरवर्षी फक्त जयंतीला एखादा तरी मंत्री, आमदार, खासदार येतात. घोषणा करतात. परंतु काहीही करत नाहीत. परंतु यावर्षी तर कोणताही मंत्री, आमदार, खासदार किंवा साधा जिल्हास्तरीय अधिकारीही उपस्थित राहू शकला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार व आमदार फक्त बॅनरवरच झळकले. परंतु प्रत्यक्षात मात्र कोणीही उपस्थित नव्हते.