हातावर पोट असणाऱ्यांची पायपीट

नवी दिल्ली – अवघा देश लॉकडाउन आहे. हातावरचं पोट असलेल्या कामागारांचे हाल सुरु झाले आहेत. अशात अहमदाबादमधल्या स्थलांतरित कामगारांनी घरी परतण्यास सुरुवात केली आहे. ती देखील पायपीट करत. हे सगळे कामगार राजस्थानातील डुंगरपूर जिल्ह्यात असलेल्या एका गावातले रहिवासी आहेत. या सगळ्यांना त्यांचा प्रवास पायीच संपवावा लागणार आहे. अहमदाबाद ते डुंगरपूर हे 150 किमीचं अंतर त्यांना चालत पार करावं लागणार आहे.
देश लॉकडाउन असल्याने संपूर्ण देशात प्रवास करण्याचं एकही साधन उपलब्ध नाही. दिवसांसाठी म्हणजेच एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. आम्ही अहमदाबादमध्ये रोजंदारीवर काम करत होतो. मात्र आता इथेच थांबलो तर आमची उपासमार होईल. इथे थांबण्यात काहीही अर्थ नाही. हाताला काम नाही त्यामुळे खायला अन्न नाही अशी आमची अवस्था आहे अशी व्यथा एका कामगाराने बोलून दाखवली.





