Panjab News : सीमेपलीकडून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक; पंजाब सुरक्षा दलांची मोठी कारवाई
पंजाबमध्ये (Panjab News) सुरक्षा दलांनी महत्वपूर्ण कारवाई करत सीमेपलिकडून अंमली पदार्थांची तस्करी करणारे जाळे उघडकीस आणले. त्या जाळ्याचा भाग असणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली.

Panjab News : पंजाबमध्ये (Panjab News) सुरक्षा दलांनी महत्वपूर्ण कारवाई करत सीमेपलिकडून अंमली पदार्थांची तस्करी करणारे जाळे उघडकीस आणले. त्या जाळ्याचा भाग असणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. तसेच, २४ किलो हेरॉईन साठा आणि २१ लाख रूपयांची रोकड जप्त केली.पंजाब पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) विशेष स्वरूपाची संयुक्त मोहीम राबवली.
त्या माेहिमेवेळी पंजाबमधील (Panjab News) अमृतसरचे रहिवासी असणारे तिघे जाळ्यात आले. त्यांचे पाकिस्तानस्थित तस्करांशी लागेबांधे असल्याचे स्पष्ट झाले. अटक करण्यात आलेल्यांकडून मल्टी-कॉप्टर ड्रोनही हस्तगत करण्यात आले. त्या ड्रोनचा वापर पाकिस्तानस्थित तस्करांकडून भारतीय हद्दीत अंमली पदार्थ पाठवण्यासाठी केला जात होता. सुरक्षा दलांनी २ कारही जप्त केल्या.
अंमली पदार्थांच्या विक्रीत गुंतलेल्या आरोपींनी अवैध पैशांतून उच्चभ्रू भागांमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचे उघड झाले. त्यामुळे संबंधित तस्करीच्या जाळ्याचा विस्तार मोठा असण्याची शक्यता पुढे (Panjab News) आली आहे. त्यातून पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. संबंधित जाळ्यातील आणखी काही सदस्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.






