Punjab Lottery – असे म्हणतात की नशीब कधी, कुठे किंवा कसे कुणावर फिदा होईल, हे कोणालाही माहिती नसते. केवळ उधारीमध्ये घेतलेल्या ‘पंजाब राज्य लॉटरी’च्या दिवाळी बंपर २०२५ चा पहिला पारितोषिक विजेता ठरलेल्या कोटपुतली येथील एका साध्या भाजी विक्रेत्याने तब्बल ११ कोटी रुपयांचे बक्षिस जिंकले आहे. हा भाग्यवान व्यक्ती म्हणजे कोटपुतली येथील रहिवासी अमित सेहरा. ३२ वर्षीय अमित रस्त्याच्या कडेला भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करत असे. अमित सेहराने भटिंडा येथे ५०० रुपयांना हे लॉटरीचे तिकीट खरेदी केले. ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी लुधियाना येथे झालेल्या सोडतीत त्याने पहिले बक्षीस जिंकले आणि त्याला ११ कोटी रुपये मिळाले. या महत्त्वपूर्ण विजयानंतर, अमित बुधवारी त्याच्या कुटुंबासह भटिंडा येथे पोहोचला, जिथे त्याला बक्षिस सुपूर्त केले गेले. अमित म्हणाला की, त्याला अजूनही विश्वास बसत नाही की नशिबाने त्याला इतकी मोठी बातमी दिली आहे. या पैशाचा वापर त्याच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, त्याच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आणि चांगले जीवन जगण्यासाठी करेल. या आनंदाच्या बातमीनंतर, कोटपुतली येथील अमितच्या घरात आणि परिसरात उत्सवाचे वातावरण आहे. लोक त्याचे अभिनंदन करण्यासाठी सतत येत आहेत आणि एका कष्टाळू माणसाचे नशीब एका क्षणात कसे बदलले यावर चर्चा करत आहेत. या दिवाळी बंपर लॉटरीत दुसरे बक्षीस म्हणून १ कोटी रुपये आणि तिसरे बक्षीस म्हणून ५० लाख रुपयांची तरतूद होती, परंतु कोटपुतली येथील अमितने तब्बल ११ कोटी रुपये जिंकले आहेत.