Punjab Lok Sabha Election । पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दल (एसएडी) यांच्या युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळालाय. भाजपने आज लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार असल्याचे जाहीर केले. खुद्द पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून माहिती दिली.
जनतेचा, कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा कौल विचारात घेऊन पक्षाने आगामी लोकसभा निवडणूक पंजाबमध्ये स्वतंत्रपणे लढणार असल्याचा निर्णय घेतलाय, पंजाबमधील सर्व शेतकरी, पंजाबमधील व्यापारी, सहकारी यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाब, पंजाबचे मजूर, पंजाबचे मागासवर्गीय.. कारण पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाने पंजाबसाठी जे काम केले आहे ते कोणापासून लपलेले नाही. असे स्पष्ट मत सुनील जाखड यांनी व्यक्त केले आहे.
BJP to contest the Lok Sabha elections alone in Punjab.
ਭਾਰਤੀ ਜਨਤਾ ਪਾਰਟੀ ਲੋਕ ਸਭਾ ਚੋਣਾਂ ਪੰਜਾਬ ਵਿਚ ਇੱਕਲੇ ਲੜਨ ਜਾ ਰਹੀ ਹੈ। pic.twitter.com/FbzfaePNj3
— Sunil Jakhar(Modi Ka Parivar) (@sunilkjakhar) March 26, 2024
काय अंदाज लावले जात होते ? Punjab Lok Sabha Election ।
शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांच्यात समझोता होण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीतील युतीबाबत वर्तवली जात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) माजी मित्रपक्ष भाजप आणि SAD यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र आता तसे होताना दिसत नाही. अकाली दलाने 2020 मध्ये कृषी कायद्याच्या निषेधार्थ युतीशी संबंध तोडले.
पंजाबमध्ये 13 जागांसाठी 1 जून रोजी मतदान Punjab Lok Sabha Election ।
पंजाबमध्ये 13 जागांसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. अकाली दलानेही, भाजपसोबत युती करण्यात फारसा रस दाखवत नसून, शुक्रवारी लोकसभेच्या निवडणुकीत पंजाबमधील जनतेकडे जनादेश मागण्यासाठी मुद्दे, धोरणे आणि तत्त्वे यांची यादी करणारा ठराव जारी केला. . पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे आणि इंडिया अलायन्स अंतर्गत येथे काँग्रेससोबत कोणताही करार नाही. येथे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत.
हेही वाचा
पंजाबमध्ये अकाली दल-भाजप यांच्यातील युतीची चर्चा निष्फळ ; ‘या’ मुद्द्यांवर झाली युती फेल