Punjab Flood | पंजाबमध्ये आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. 10 जिल्ह्यांमधील 1018 गावांना पुराचा तडाखा बसला आहे. तर 61000 हेक्टरहून अधिक शेती जमीन बाधित झाली आहे. सध्या येथे मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. गुरुदासपूर जिल्ह्यातील सर्वाधिक गावांना पुराचा फटका बसला आहे. गेल्या 24 तासांत 4711 लोकांना वाचवण्यात आले आहे, यामध्ये फिरोजपूरमधील 812, गुरदासपूरमधील 2571, मोगामधील 4, बरनालामधील 25 आणि फाजिल्कामधील 1239 लोकांचा समावेश आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री बी. कुमार गोयल यांनी जर केंद्राच्या अखत्यारीतील भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाने (बीबीएमबी) जूनमध्ये वेळेवर पाणी सोडले असते तर हा विध्वंस मोठ्या प्रमाणात कमी करता आला असता, असा दावा केला आहे. शाळांना सुट्टी जाहीर पंजाब सरकारने चार दिवसांसाठी शाळांना सुट्टी जाहीर केली होती. गेल्या बुधवारपासून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू होऊ शकतात, परंतु याबाबत अंतिम निर्णय सरकारकडून घेतला जाईल. कारण पंजाबमधील पूर परिस्थिती अजूनही गंभीर आहे. Punjab Flood | पठाणकोटमध्ये सर्वाधिक 81 गावे पुराने प्रभावित झाली आहेत. फाजिल्कामधील 52, तरणतारणमधील 45, श्री मुक्तसर साहिबमधील 64, संगरूरमधील 22, फिरोजपूरमधील 101, कपूरथलामधील 107, गुरदासपूरमधील 323, होशियारपूरमधील 85 आणि मोगामधील 35 गावांचा समावेश आहे. पुरामुळे पंजाबला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. पिकांच्या नासाडीसह पशुधनाचाही नाश झाला आहे. फाजिल्का जिल्ह्यात 16,632 हेक्टर जमीन पुराच्या तडाख्यात आली आहे. फिरोजपूरमध्ये 10,806 हेक्टर, कपूरथलामध्ये 11,620, पठाणकोटमध्ये 7,000, तरणतारणमध्ये 9,928 आणि होशियारपूरमध्ये 5,287 हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री बी. कुमार गोयल यांनी जर केंद्राच्या अखत्यारीतील भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाने (बीबीएमबी) जूनमध्ये वेळेवर पाणी सोडले असते तर हा विध्वंस मोठ्या प्रमाणात कमी करता आला असता, असा दावा केला आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पंजाबसाठी विशेष मदत पॅकेजची मागणी केली. दरम्यान, अकाल तख्त जत्थेदार ज्ञानी कुलदीप सिंह गर्गज यांनी शनिवारी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यांनी सर्वांना या कठीण काळात एकमेकांना पाठिंबा देण्याचे आणि संकटात अडकलेल्या प्रत्येकाला मदत करण्याचे आवाहन केले. Punjab Flood | हेही वाचा: सोने खरेदी करण्याअगोदर वाचा आजचा नवीन दर ; एका आठवड्यात किंमत किती बदलली ?, जाणून घ्या