सुसाट दिल्लीसमोर पंजाबचे आव्हान

मोहाली: फलंदाज आणि गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर गुणतालीकेत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स समोर आज किंग्ज इलेव्हन पंजाबचे तगडे आव्हान असणार आहे.

दिल्लीच्या संघाने आतापर्यंत खेळलेल्या तिनही सामन्यात प्रभावी कामगिरी केली असून आपल्या तीन सामन्यात दिल्लीने एक पराभव पत्करला असला तरी त्यांनी दोन विजयांसह दुसरे स्थान गाठले असून स्पर्धेत आता पर्यंत दिल्लीच्या सर्वच फलंदाजांनी जबाबदारीने फलंदाजी करत संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. ज्यात पृथ्वी शॉ, शिखर धवन, ऋषभ पंतयांनी मोक्‍याच्या क्षणी आपली कामगीरी उंचावली आहे. त्यातच त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवनयांना मिळालेल्या चांगल्या सुरूवातीचा फायदा उचलून मोठ्या खेळी करण्यात अपयश आल्याने संघांना बऱ्याच वेळा संघर्षाचा सामना करावा लागला आहे. तर, त्यांच्या गोलंदाजांनी सर्वच सामन्यात प्रभावी कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघाला बांधुन ठेवण्याचे काम योग्य प्रकारे पार पाडले आहे. ज्यात कागिसो रबाडा, संदिप लामिचाने यांचा उल्लेख महत्वाचा असणार आहे.

तर, दुसरीकडे पंजाबच्या संघाने आता पर्यंत संमिश्र कामगिरी करत स्पर्धेत आता पर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय मिळवला असून एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांचा सलामीवीर लोकेश राहुल पुन्हा एकदा चांगल्या फॉर्ममध्ये परतला आहे. राहुलने मुंबई विरुद्धच्या सामन्यात अखेरपर्यंत मैदानावर टिकून राहुन पंजाबच्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्यातच पंजाबचा मधल्याफळीतील फलंदाज मयंक अग्रवालने तीनही सामन्यात आकर्षक फटकेबाजी करत पंजाबच्या धावगती मध्ये कमालीची वाढ केली होती. त्यामुळे दिल्लीच्या गोलंदाजांना पंजाबच्या फलंदाजांसाठी वेगळी रणनिती आखण्याची गरज असून पंजाबच्या मोहम्मद शमी आणि ऍण्ड्रयु टाययांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला असून आजच्या सामन्यात त्यांच्या समोर दिल्लीच्या फलंदाजांना रोक्‍घण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ –
किंग्ज इलेव्हन पंजाब – रविचंद्रन अश्‍विन (कर्णधार), लोकेश राहुल, ख्रिस गेल, अँड्य्रू टाय, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, सॅम करन, वरुण चक्रवर्ती, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयची, सरफराज खान, अर्शदीप सिंह, दर्शन नलकंडे, एम अश्‍विन, हार्डस विल्युनख, हरप्रीत ब्रार.

दिल्ली कॅपिटल्स – श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतिया, जयंत यादव, मनजोत कालरा, कॉलीन मुनरो, कगिसो रबाडा, संदीप लामिचाने आणि ट्रेंट बोल्ट, हनुमा विहारी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, अंकुश बॅंस, नाथू सिंह, कॉलिंग इंग्राम, शरफेन रदरफोर्ड, किमो पाउल, जलज सक्‍सेना, बंडारु अय्यप्पा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.