पुणे – शहरात एकीकडे करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे भीती व्यक्त होत आहे. तर, दुसरीकडे रविवारी (दि.5) बाधित रुग्णांमधील 5 जणांचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडले. हे वृत्त दिलासा देणारे आहे.
आतापर्यंत दाखल झालेल्या करोना बाधित रुग्णांपैकी 10 जणांना घरी सोडले आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून शहरातील बाधितांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, याच दिवशी दिलासा देणारीही घटना घडली ती म्हणजे दाखल झालेल्या
5 जणांचा 14 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.
त्यानुसार त्यांची पुन्हा दोनवेळा नमुने तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे रविवारी त्यांना घरी सोडले आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.