Pune Ganesh Visarjan 2025 | पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक 24 तास उलटून गेले तरी सुरूच आहे. मिरवणुकीला काल सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात झाल्यानंतर अजूनही मिरवणुका सुरूच आहेत. त्यामुळे यंदाचीही मिरवणूक रेंगाळली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अद्यापही असंख्य गणेश मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झालेले नाही. मानाच्या गणपतींची मिरवणूक यंदा लवकर संपली तर कालच मानाच्या पाच गणपतीचे 5 वाजून 40 मिनिटांपर्यत विसर्जन करण्यात आले. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे 9 वाजून 25 मिनिटांनी विसर्जन झाले. यंदा मिरवणूक 9:30 वाजता सुरु झाली आणि 5:39 वाजता म्हणजे 8 तास 09 मिनिटांनी मिरवणूक संपली तर गेल्या वर्षी 10 वाजता सुरु झालेल्या मिरवणुका 9 तास 33 मिनिटं चालली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मानाच्या गणपतींची मिरवणूक 1 तास 24 मिनिटं आधी संपली. Pune Ganesh Visarjan 2025 | त्यानंतर टिळक रोड, कुमठेकर रोड वरील डीजे मिरवणुक पाहण्यास नागरिकांनी पाहण्यास पसंती दिली. पण रात्री बारानंतर डीजे बंद झाल्यानंतर अनेक मंडळ आहे त्या जागी थांबले. त्यानंतर सकाळी ६ वाजता डीजे सुरू करून मिरवणुक सुरू झाली असून अलका टॉकीज चौकात लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड या मार्गावरून आलेल्या मिरवणुका संथगतीने पुढे जात आहे. पुणे पोलिस गणपती मंडळांपुढे हतबल झाले आहेत. नियोजन करूनही पुण्यातील विसर्जन मिरवणूक रेंगाळली आहे. अलका टॉकीज चौकात गर्दीच्या ठिकाणी फटाके उडवल्याचे प्रकारही घडले. Pune Ganesh Visarjan 2025 | हेही वाचा : पुण्यात येरवडा कॉमरझोन आयटी पार्कला भीषण आग; जवानांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला