#PKLSeason10 (#TTvPUN Match 51) : पुणेरी पलटणची 2024 वर्षाची धमाकेदार सुरुवात,तेलुगू टायटन्सवर एकतर्फी विजय..

नोएडा । अस्लम इनामदार आणि मोहित गोयतच्या सुपर-10 च्या नेतृत्वामुळे पुणेरी पलटणने 2024 वर्षाची सुरुवात शानदार विजयाने केली आहे. पुणेरी पलटण संघाने सोमवारी येथील नोएडा इनडोअर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) 10व्या हंगामातील 51व्या सामन्यात तेलुगू टायटन्सचा 54-18 असा पराभव केला आहे.
पलटन की प्रचंड जीत 💪🔥
तेलुगु टाइटंस के ख़िलाफ अपनी सातवीं जीत हासिल करते हुए टेबल के 🔝 पर पहुंची 🧡 #ProKabaddi #ProKabaddiLeague #PKL #PKLSeason10 #HarSaansMeinKabaddi #TTvPUN #TeluguTitans #PuneriPaltan pic.twitter.com/hWBMaghmgQ
— ProKabaddi (@ProKabaddi) January 1, 2024
या विजयासह पुणेरी पलटण संघानं 7 व्या विजयासह गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठले आहे. पुणेरीकडून मोहित गोयतने 13 तर अस्लमने आठ गुण घेतले. तेलुगू टायटन्सचा कर्णधार पवन सेहरावत केवळ दोन गुण मिळवू शकला.





