Pune ZP election results 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकींच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी जवळपास २९९ तर १३ पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ५२८ उमदेवार रिंगणात होते. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे आता थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानुसार, या निवडणुकीचे पुणे जिल्हा परिषदेतील पहिले कल हाती आले आहेत. त्यानुसार पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे. जिल्ह्यात सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी २२ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर भाजप १५ आणि शिवसेना (शिंदे) ३ जागेवर आघाडीवर आहे. INC High Profile Meeting: काँग्रेसची ८ राज्यांसोबत मोठी बैठक ; बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर लक्ष केंद्रित बारामतीच्या सुपे गणात भाजपाचा विजय बारामतीच्या सुपे गणात भाजपाचा विजय झाला आहे. बारामतीच्या सुपे गणात भाजपाच्या उज्ज्वला पोपट खैरे यांना 7466 मते मिळाले असून त्यांचा विजय झाला आहे. तर पराभूत अपक्ष उमेदवार मनीषा हनुमंत चांदगुडे यांना 4797 मते मिळाले आहेत. तसेच पुण्यातील भोर तालुक्यात भाजपाने खातं उघडलं असून ज्ञानेश्वर पांगरे वेळू गणातून विजयी झालेले आहेत. पुण्यातील मावळमध्ये जिल्हा परिषदेच्या पाच पैकी ३ जागांवर अजित पवार यांची राष्ट्रवादी आघाडीवर तर २ जागांवर भाजप आघाडीवर आहे. याशिवाय आंबेगावात दिलीप वळसे पाटील यांचा पुतण्या विवेक वळसे पिछाडीवर आहेत. हेही वाचा: Top 10 news: मिनी मंत्रालयावर कोणाची सत्ता येणार?,अजित पवारांच्या विमान अपघातामागील सत्य काय?,अशा टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर