पुणे : महापालिकेच्या टँकरच्या धडकेमुळे महिलेला जीव गमवावा लागला. ही घटना ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी धायरीतील धायरेश्वर मंदिर परिसरात घडली. या प्रकरणात टँकर चालकाविरूद्ध नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षा प्रकाश रांगळे (४५ रा. धायरी ) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत वैभव रांगळे (२५) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार टँकर चालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा रांगळे कुटूंबियासह धायरी परिसरात राहायला होत्या. दि. ६ फेब्रुवारीला सायंकाळी दुचाकीस्वार वर्षा या धायरेश्वर मंदिर कॉर्नर परिसरातून जात होत्या. त्यावेळी मागून आलेल्या टॅंकर चालकाने वर्षा यांच्या दुचाकीला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या वर्षा यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव तपास करीत आहेत.