पुणे – शहरात कष्टकरी राहत असलेल्या झोपडपट्ट्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या काशेवाडी-डायस प्लॉट भागात ही झोपडपट्टीधारकांची संख्या मोठी आहे. येत्या काळात झोपडपट्टीवासियांच्या शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सोयीसुविधांसाठी विशेष काम करणार असल्याचे प्रभाग २२ ड चे उमेदवार अविनाश रमेश बागवे यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने बागवे यांनी लोहियानगर भागातील वसाहतीत पदयात्रेद्वारे येथील नागरिकांशी संवाद साधला. या वेळी इंदिरा बागवे, अविनाश बागवे, रफिक शेख, दिलशाद शेख माजी राज्यमंत्री मा. रमेशदादा बागवे, मधुकर चांदणे, पप्पू माने, यासर बागवे, दयानंद अडागळे, विजय खेडेकर, राजू भरगुडे, शफीक शेख, बाळू कसबे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उमेदवारांच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. या भागातील नागरिकांच्या अनेक समस्या असून, नगरसेवक म्हणून सोडविण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहे. मात्र, पुढील पाच वर्षांत या समस्या कायमच्या सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचे आश्वासन यावेळी उमेदवारांकडून देण्यात आले.