डॅशबोर्डही रोजच्या रोज भरणे बंधनकारक करणार
पुणे – करोना बाधितांची संख्या वाढत आहे, ही लाट आधीसारखीच असेल हे गृहित धरून खासगी रुग्णालयांकडून बेड रिकामे ठेवण्याची हमी घेणार आहे. याबद्दल आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी माहिती दिली.
बाधित संख्या वाढत चालल्यानंतर सर्व रुग्णालयांना कॉल करणे सुरू केले होते. त्यांनी ही माहिती द्यावी, अन्यथा महापालिका स्वत:हून ते बेड नियंत्रित करणार याची तयारी ठेवा, असेही सांगण्यात येणार आहे. तसेच डॅशबोर्ड रोजच्या रोज भरावे लागणार आहे.
महापालिकेच्या डॅशबोर्डवर आधीच्या करोना लाटेवेळी खासगी आणि सरकारी मिळून 84 रुग्णालये होती. सध्या 72 आहेत. या रुग्णालयांमध्ये मिळून 4,457 बेड आहेत. त्यातील 1,072 बेड सरकारी रुग्णालयातील आहेत. त्यातील 30 प्रसूतीसाठी राखीव आहेत.
तसेच सध्या डॅशबोर्डवर खासगी आणि सरकारी रुग्णालयांतील मिळून 155 विना व्हेन्टिलेटर आणि 211 व्हेन्टिलेटरसह आयसीयू उपलब्ध आहेत, असेही डॉ. नाईक म्हणाल्या.