पुणे : वसुली आदेशामागील सूत्रधार कोण? : शिवसेना

पुणे – नियमांचा बडगा उगारत पुणेकरांकडून दिवसाला दहा लाख रुपये दंड वसूल करण्याचा आदेश रद्द करण्यात आला. पण, या आदेशामागचा नेमका सूत्रधार कोण? याचा तातडीने खुलासा करावा, अशी मागणी शिवसेनेने पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, जिल्हा प्रमुख विजय देशमुख, नगरसेवक बाळा ओसवाल, पल्लवी जावळे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी आयुक्तांसमोरच निषेधाचे फलक धरले.

दरम्यान, “याप्रकरणी उपायुक्‍त माधव जगताप यांना आयुक्‍तांनी नोटीस बजावली आहे. याबाबत तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर कारवाई न झाल्यास पुन्हा आयुक्तांना भेटणार आहोत,’ असे मोरे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.