पुणे – पर्वती येथील मुख्य वाहिनीची गळती रोखण्यासाठी जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, नवीन पर्वती, वारजे, एनएनडीसी जलशुद्धीकरण,नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपिंग भाग, तसेच कोंढवे- धावडे जलकेंद्र बंद ठेवण्यात येणार आहे. या जलकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. १७) बंद असणार आहे. त्यामुळे सर्व पेठा, संपूर्ण कोथरूड, संपूर्ण कर्वेनगर, एरंडवणे, पौंड रस्त्याच्या दोन्ही बाजू, चांदणी चौक, पॅनकार्ड क्लब, चतुःश्रृंगी, पाषाण, औंध, बोपोडी, शिवाजीनगर, सेनापती बापट रस्ता परिसर, पूर्ण गणेशखिंड रस्त परिसर, गोखले नगर, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, वडारवाडी, पुणे विद्यापीठाच्या आसपासचा परिसर, खडकी परिसर, वारजे, उत्तमनगर शिवणे, एनडीए परिसराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी (ता. १८) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. लष्कर, वडगाव, नगररस्ता भागात नियमित पाणी या दिवशी महापालिकेचे हडपसर, कोंढवा, मगरपट्टा, मुंढवा परिसरात पाणी पुरवठा करणारे लष्कर जलकेंद्र, सिंहगड रस्ता, कात्रज, कोंढव्याच्या काही भागाला पाणी पुरवठा करणारे वडगाव जलशुध्दीकरण केंद्र तसेच संपूर्ण नगर रस्ता परिसरात पाणी पुरवठा करणारे भामा- आसखेड जलशुध्दीकरण केंद्र महापालिकेकडून सुरूच असल्याने या जलकेंद्रावर असलेल्या भागाला नियमित पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.