पुणे -चतु:श्रृंगी पाणी पुरवठा विभागा अंतर्गत चतु:श्रुंगी टाकीच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवार दि. 4 जानेवारी 2023 रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा बुधवार रोजी बंद राहणार आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी गुरुवार दि. 5 जानेवारी रोजी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. याची सर्व संबंधित भागातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
या भागांत पाणी पुरवठा बंद
सकाळ नगर, औंध रोड, आयटीआय रोड, औंध गाव आणि बाणेर रोड, पंचवटी पाषाण,निम्हण मळाभाग, लमाणतांडा वस्ती, पाषाण गावठाण काही भाग, चव्हाण नगर पोलीस लाईन, अभिमान श्री सोसायटी, आंबेडकर चौक ते गोकुळी भोईटे वस्ती, राजभवन, भोसले नगर, पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंत, रोहन निलय, औंध उजवीकडील सर्व बाजू, बाणेर,बोपोडी इंटिश वसाहत व कस्तुरबा वसाहत.