पुणे-महापालिकेकडून समान पाणी योजने अंतर्गत पर्वती जलकेंद्राची मुख्य जलवाहिनी नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांना जोडण्यात येणार आहेत. तसेच, होळकर जलकेंद्र, चिखली पंपिंग स्टेशन, भामा आसखेड पाणीपुरवठा योजने अंतर्गत स्थापत्य विषयक कामे केली जाणार असल्याने शहराच्या मध्यवर्ती पेठांसह बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी (दि. 3 फेब्रुवारी) बंद ठेवण्यात येणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी ( दि. 4) उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
बुधवार दि. 2 – रात्री 10. ते गुरुवार दि.3 – रात्री 10 पर्यंत पाणीपुरवठा बंद, तसेच शुक्रवारी (दि. 4)- डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, भवानी पेठ व नाना पेठेत कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.