पुणे – येत्या रविवारी (दि. 27 ) रोजी महावितरणकडून भामा-आसखेड धरण परिसरात तातडीची विद्युत विषयक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे धरण परिसरातील असलेल्या महापालिकेच्या भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने या दिवशी नगर रस्ता परिसरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी ( सोमवारी) उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा राहणार आहे.
पाणी बंद असणारा भाग
लोहगाव, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणी नगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा आणि इतर