महर्षीनगर – पुणे महापालिकेच्या प्रभाग क्र. २१ मुकुंदनगर-सॅलसबरी पार्क येथील काँग्रेस पक्षाचे उमेदवार अक्षय जैन, डॉ. स्नेहल पाडळे, योगिता सुराणा व पुष्कर आबनावे यांनी मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर येथे नागरिकांशी संवाद साधला. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या महर्षी नगर भागात अनेक वर्षा नंतर काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पाहण्यास मिळत आहे. यावेळी काँग्रेस नेते ॲड. अभय छाजेड यांच्यासह आंबेडकर नगरमधील ज्येष्ठ व सक्रिय नागरिक इमाम हनुरे, रुक्मिणी देडे, रावसाहेब खवळे, धनंजय देडे, सुरेश चौधरी, दौला अत्तार, कृष्णा सोनकांबळे, रमेश सोनकांबळे, अकबर मान्यार, अशोक नेटके, नीता नेटके, जाहिर शेख, कांतिलाल क्षीरसागर, सादिक शेख, सुलैमान सुलतान खान, सुरेश सामुकराव, मन्सूर अमीन खान, जाहिदा इस्माईल खान आदी उपस्थित होते. या भेटीदरम्यान उमेदवारांनी पायाभूत सुविधा, नागरी सुविधा तसेच दैनंदिन समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी व सूचना ऐकून घेतल्या. हे प्रश्न सोडविण्यासाठी आपणी कटीबद्ध असल्याचे उमेदवारांनी सांगितले. या प्रचार भेटीला आंबेडकर नगरमधील नागरिकांचा मोठ्या संख्येने उपस्थित राहत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. या संवादात्मक भेटीमुळे प्रभाग क्र. २१ मध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून, विकासाभिमुख, लोकाभिमुख व सर्वसमावेशक राजकारणाला नागरिकांचा ठाम पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले आहे