पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या विविध उद्यानांमध्ये सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांशी प्रभाग २५ मधून भाजपतर्फे निवडणूक लढवत असलेले राघवेंद्र ऊर्फ बाप्पू मानकर यांनी थेट संवाद साधला. याशिवाय प्रभागातील उद्यानांमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि व्यायामप्रेमी नागरिकांसाठी स्वतंत्र वाॅकिंग ट्रॅक, व्यायामासाठी आवश्यक साहित्य, तसेच प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मानकर यांनी दिले. मानकर यांच्यासह भाजपचे प्रभाग २५ मधील अधिकृत उमेदवार स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित यांनीही वर्तक बाग, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, सारस बाग, महाराणा प्रताप उद्यान आणि साठे उद्यानांत व्यायामप्रेमी नागरिकांशी संवाद साधला. आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आणि व्यायामप्रेमी नागरिकांसाठी स्वतंत्र वॉकिंग ट्रॅकची उभारणी करणार आहोत. व्यायामासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मानकर यांनी ज्येष्ठ नागरिकांशी बोलताना दिली. या वेळी माजी नगरसेवक राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, पक्षाचे मतदार संघ अध्यक्ष अमित कंक, बिपिन बोरावके, मनीष जाधव, किरण जगदाळे, कुणाल आहेर, धनंजय डिंबळे आणि भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.