Pune: बांधकाम व्यवसायात सहसा केवळ व्यवहार आणि घरांच्या विक्रीची भाषा बोलली जाते. मात्र, या पलीकडे जात विलास जावडेकर डेव्हलपर्सने (व्हीजे) सामाजिक बांधीलकी आणि आपुलकी जपल्याचे आश्वासक चित्र पुण्यात पाहायला मिळाले. सुस येथील सनीज वर्ल्ड येथे नुकताच दोन दिवसीय ‘व्हीजे परिवार कार्निव्हल’ अत्यंत उत्साहात पार पडला, जिथे घरमालक आणि बांधकाम कामगारांच्या मुलांनी एकत्र येत खेळांचा आणि मनोरंजनाचा आनंद लुटला. १० हजार सदस्यांचा सहभाग – शनिवार, दि. १४ आणि रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी आयोजित या कार्निव्हलमध्ये तब्बल १० हजार व्हीजे परिवारातील सदस्य सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी ५,५३४ तर दुसऱ्या दिवशी ४,२५२ नागरिकांनी या मेळाव्याला हजेरी लावली. विशेष म्हणजे, केवळ पुण्यातीलच नव्हे तर मुंबई, नागपूर, बंगळुरू आणि हैदराबाद येथील रहिवाशांनीही या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. मालक आणि कामगारांमधील मैत्रीपूर्ण सामना – या कार्निव्हलचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘व्हीजे कन्स्ट्रक्शन लेबर टीम’ आणि ‘व्हीजे सोसायटी’तील रहिवासी यांच्यात रंगलेला क्रिकेटचा सामना. व्यावसायिक दुरावे बाजूला सारून कामगार आणि ग्राहक एकाच मैदानात खेळताना दिसले, ज्यामुळे समाजात एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. “बांधकाम व्यवसायात कामगार वर्ग हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ग्राहकांचे महत्त्व सर्वच जाणतात, पण कामगारांचे योगदान विसरले जाते. आमच्याकडे कामगारांना कायमच सन्मानाची वागणूक दिली जाते आणि त्यांना त्यांच्या कुटुंबासह या आनंदात सहभागी करून घेणे, हा आमच्या ‘आपलेपणा’च्या परिभाषेचा भाग आहे.” — धनश्री शिंदे, उपाध्यक्ष, व्हीजे परिवार मनोरंजनाची मेजवानी – दोन दिवस चाललेल्या या कार्निव्हलमध्ये लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. मातीकाम, मॉकटेल मेकिंग, मेकअप, सालसा नृत्य, कॉफी मेकिंग, चित्रकला आणि पपेट शो कार्यशाळा आयोजित केली होती. रायफल शूटिंग, रेन डान्स, धनुर्विद्या, डार्ट गेम्स, क्रेझी रोलर, व्होर्टेक्स टनेल आणि बुल राइड असे खेळ रंगले होते. लाइव्ह परफॉर्मन्स, फ्ली मार्केट आणि विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखील होते. घरविक्रीच्या पलीकडे जाऊन आपल्या ग्राहकांसाठी आणि कामगारांसाठी अशा प्रकारचा मेळावा आयोजित करणारा हा बांधकाम क्षेत्रातील एक आगळावेगळा उपक्रम ठरला आहे.