पुणे : वसंतोत्सव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ गायक आणि गुरू पं. विजय कोपरकर, संगीताचार्य पं. सुधीर पोटे, युवा मोहनवीणा वादक मानस गोसावी आणि संतूर वादक शंतनू गोखले यांना जाहीर झाले आहेत.
ज्येष्ठ गायक स्व. पं. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येतात. कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म्स येथे दि. १९ जानेवारी रोजी वसंतोत्सव संगीत महोत्सवात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
दरवर्षी संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार वा गुरु, संगीत अभ्यासक कलाकार वा संशोधक आणि युवा कलाकार यांना सदर प्रतिष्ठानच्या वतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.