पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे मंगळवारी एकूण 196 केंद्रांवर डोस मिळणार असून, त्यातील 6 केंद्रांवर कोवॅक्सीन आणि 61 केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोवीशिल्ड चे डोस मिळणार आहेत. याशिवाय 120 केंद्रांवर 45 वर्षे वयापुढील नागरिकांना लस मिळणार आहे. कोवॅक्सिनसाठी दि. 1 जूनपूर्वी पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस मिळणार आहे. त्यातील 50 टक्के डोस हे ऑनलाइन बुकिंग केलेल्यांना तसेच उर्वरित 50 टक्के लस ही ऑन दी स्पॉट आलेल्यांना मिळणार आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 61 ठिकाणी पाहिला डोस मिळेल. ऑनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांनाच लस मिळेल. त्यासाठी बुधवारी सकाळी आठ वाजता ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे.