पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे मंगळवारी 197 केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून, दोन्ही लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोवॅक्सिनचे केंद्र वाढवत 7 वरून 11 करण्यात आले आहे.
कोविशील्डचे 186 केंद्रांवर प्रत्येकी 250 डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, कोवॅक्सिनचे 300 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच कोवॅक्सिनचे डोस 11 केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविशील्डच जो पहिला डोस मिळणार आहे त्याच्या ऑनलाइन बुकींगची टक्केवारी 15 टक्के असून, ऑन दि स्पॉट बुकींगही 15 टक्के आहे. तर कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे त्यातील 15 टक्के लस ही ऑनलाइन बुकींग करून तर 15 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.