पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे शनिवारीवारी “कोवॅक्सिन’ आणि “कोविशिल्ड’ दोन्ही लस उपलब्ध करून देण्यात आले असून, 190 केंद्रांवर लसीकरण होणार आहे.
कोविशिल्ड लस ही 184 केंद्रांवर तर कोवॅक्सिन ही लस 6 केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. कोवॅक्सिनचे प्रत्येक केंद्रांवर 200 तर कोविशिल्डचे 100 डोस उपलब्ध असतील.
18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविशिल्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 40 टक्के लस ऑनलाइन बुकींग करून तर 20 टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल. तर कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे.
त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्के ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल. 23 एप्रिलपूर्वी पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना बुधवारी 20 टक्के लस ऑनलाइन बुकींग करून तर 20 टक्के ऑन दि स्पॉट दुसरा डोस दिला जाईल.