पुणे : फर्गसन कॉलेज रस्त्यावर महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने गुरुवारी अतिक्रमणविरोधी कारवाई करीत साडेबारा हजार फुटांचे अनधिकृत बांधकाम पाडले. फर्गसन रस्त्यावरील फायनल प्लॉट क्र. ६१४ बी येथील अनधिकृत दुकाने हटवण्यात आली. ही कारवाई शहर अभियंता आणि अधीक्षक अभियंता राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली, बांधकाम विकास विभाग झोन सहामार्फत करण्यात आली. कार्यकारी अभियंता सुरेंद्र करपे यांच्या नेतृत्वाखाली उपअभियंता रणजीत मुटकुळे, किरण कलशेट्टी, वळसे-पाटील, तसेच कनिष्ठ अभियंते महेश शिंदे, मनोजकुमार मते, सागर शिंदे, घोलप, झोडापे आणि इतर तांत्रिक सहायक आणि सेवक यांनी कारवाईत सहभाग घेतला.