Pune : आजपासून दोन विशेष रेल्वे
Updated On:

पुणे : पुणे विभागातून पुणे-जोधपूर आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल-भगत की कोठी एक्सप्रेस या दोन विशेष रेल्वेचे सेवांचा ऑनलाइन शुभारंभ उद्या (दि. ३) केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे.
त्यामध्ये विशेष ट्रेन क्रमांक ०१४०१ हडपसर (पुणे) – जोधपूर एक्सप्रेस पुणे येथून दि. ३ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुटेल आणि जोधपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता पोहोचेल, तर गाडी क्रमांक ०१४०२ जोधपूर – पुणे एक्सप्रेस (एकेरी विशेष) जोधपूर येथून दि. ४ मे रोजी रात्री साडेआठ वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पोहोचेल.
या गाडीला चिंचवड, लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सूरत, वडोदरा जंक्शन, अहमदाबाद, महेसाना, पालनपूर, आबू रोड, पिण्डवाड़ा, जवाई बॉंध, फालना, राणी, मारवाड़ जंक्शन, पाली मारवाड आणि लुनी येथे थांबे आहेत.





