Pune: व्हॉट्स अॅपवर नोटीस पाठवून ट्रिपल तलाक

पुणे – व्हॉट्स अॅपवर नोटीस पाठवून ट्रिपल तलाक देण्याऱ्या पतीवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लाखो रुपये खर्च करून लग्न (निकाह) लावून दिले असतानाही त्यानंतर पुन्हा एक कोटी वीस लाख रुपये घेण्यात आले. यामुळे पैशांसाठी छळ, चारित्र्यावर संशय, बदनामी आणि घराबाहेर काढल्याप्रकरणी पतीसह दीर, जावा, नणंदा अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ३६ वर्षीय महिलेने ( रा. चिखली) फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकारांचे संरक्षण कायदा) कायदा २०१९ नुसार पती फिरोज अख्तर तसेच तसेच हुंडाप्रतिबंधक कायदा कलम ४९८, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी पती फिरोजने दि. १४ जून रोजी पहिली नोटीस पाठवून त्यामध्ये पहिला तलाक दिला आहे, असे म्हटले आहे.
त्यानंतर आणखी एका महिन्याने दुसरा तर त्यानंतर पुन्हा एका महिन्याने तिसरा तलाक देणार असल्याचे म्हटले आहे. ही नोटीस व्हॉट्स अॅप तसेच पोस्टाने पाठवली आहे. सदरील विवाहित महिला सध्या चिखली येथे तिच्या वडिलांकडे राहत आहे.
विवाहिता सध्या वडीनांसोबत चिखली येथे राहते. निकाह वेळीचा संपूर्ण खर्च तीच्या घरच्यांनी केलेला असून तो एकुण १० लाख रुपये झालेला आहे. तसेच लनात २९.५ तोळे सोने घालण्यात आले. निकाह झालेवर ती पती फिरोज अख्तर सह राहत होती. तिला एक साडेसतरा वर्षाची मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्ये आहे. लग्न झाल्यावर सासरच्या लोकांनी मला त्रास देवू नये, ती सुखात नांदावी म्हणुन तिच्या वडीलांनी दिल्ली येथील मालमत्ता विकून आलेले हिश्श्याचे १ कोटी २० लाख रुपये पती फिरोज यांना रोख दिले.
त्या पैशांमध्ये पतीने हार्दील स्टील कॉपोरेशन नावाने मोशी रोड चिखली पुणे येथे स्टील विक्री करण्याचा व्यवसाय चालु केला. त्या व्यवसायात त्यास मोठा प्रमाणावर उत्पन्न मिळु लागले. त्यामध्ये त्यास बाहेरच्या स्त्रियांचा नाद लागला. फिरोजचा भाऊ एजाज याची आयकर व विक्रीकर खात्यात खुप ओळख असुन अनेक नातेवाईक मोठमोठ्या पदांवर आहेत. तो वडिलांच्या व भावांच्या धंद्यावर धाड पाडण्यास सांगुन त्यांचेवर कारवाई करण्यास भाग पाडेल, म्हणुन फिर्यादीने होत असलेल्या त्रासाबाबत माहेरी सांगितले नाही.





