पुणे : मुकुंद शेवरे फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ऑल इंडिया ट्री अडॉपशन कॅम्पेन गणेशोत्सव दरम्यान सुरू करण्यात आले आहे. ही मोहीम पुणे, मुंबई, इंदूर, नागपूर, पालघर, दिल्लीसह देशातील इतर शहरांमध्ये ही राबविण्यात येत असून सर्वत्र जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. फाउंडेशनच्या कोर टीम सदस्या धनश्री मोरे यांनी सांगितले की, श्री गणेश मूलाधार चक्रात स्थित असून त्याचे तत्व पृथ्वीतत्व आहे. जशे स्वयंभू गणेशमूर्ती धरतीमातेच्या कुशीतून प्रकट होतात, तसेच वृक्षारोपण, वृक्ष दत्तक घेणे व त्यांचे संवर्धन करणे हीच धरतीमाते प्रती खरी सेवा आहे. या मोहिमेत लहान मुले, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक—सर्व वयोगटांतील लोक सहभागी होत आहेत. फाउंडेशनच्या वतीने उजाड दगडि जमिनीवर उगवलेली ही झाडे पाणी व खता बरोबरच कॉस्मिक एनर्जीच्या साहाय्याने वाढवली जातात. त्यामुळे ही झाडे सामान्य झाडांच्या तुलनेत अधिक लाभदायक ठरत आहेत. मुकुंद शेवरे फाउंडेशनचे संस्थापक डॉ. श्री मुकुंद शेवरे, ज्यांनी या प्रकल्पाचे कॉन्सेप्च्युअलायझेशन, डिझाईन व एक्झिक्युशन केले आहे. यांनी सांगितले की, “आपण निसर्गातूनच जन्मलो आहोत, त्यामुळे त्याची काळजी घेणे हीच आपली मोठी जबाबदारी आहे. वृक्षारोपण व ट्री अडॉप्शन हेच धरतीमातेची खरी सेवा करण्याचे सर्वोत्तम साधन आहे.” या मोहिमेत मयंक गोर, वर्षा गजाकोस, धनश्री मोरे, वरदा कोळेकर, श्रेयश पवार, साहिल उगले, ओंकार सूर्यवंशी, श्रेया कोरगावकर यांच्यासह अनेक स्वयंसेवक आपली सेवा देत आहेत. आतापर्यंत डॉ. मुकुंद शेवरे यांनी २५ हेक्टर जमिनीवर संपूर्ण जंगल उभे केले आहे. या पुण्यकार्याशी जोडण्यासाठी त्यांनी सर्व भारतीयांना आव्हान केले आहे.