पुणे – तृतीयपंथी नागरिकांनीही बजावला मतदानाचा अधिकार

पुणे – तृतीयपंथीय असलेल्या पन्ना यांनी आज कसबा मतदान केंद्रात मतदान केले. याबाबत पन्ना म्हणाल्या, “देशाच्या सरकारने तृतीयपंथी नागरिकांसाठी चांगल्या योजना लागू केल्या आहेत. आम्हाला समान नागरिकत्वाचा अधिकारही दिला आहे. त्यामुळेच यंदा सर्वांनी आवर्जून मतदान केले आहे. देशातील सर्वच नागरिकांनी मतदान केले पाहिजे कारण मतदान हे आपले प्रमुख कर्तव्य आहे. तृत्तीय पंथीय समाज हा नेहमीच देशातील, समाजातील सरव नागरिकांच्या निरोगी आणि आनंदी जीवनासाठी प्रार्थना करत असतो. ती या समाजाची परंपराच आहे. निवडून येणाऱ्या सरकारनेदेखील देशात स्वस्थता, शांतता आणि समाधान प्रस्थापित होईल यासाठी प्रयत्न करावे अशी आमची अपेक्षा आहे.’
“यंदाच्या निवडणुकीत तृतीयपंथी समाजातून एकही उमेदवार नसला तरी, आगामी काळात संधी मिळाल्यास राजकारणाच्या माध्यमातून देशसेवा करायला नक्कीच आवडेल,’ असेही पन्ना यांनी सांगितले.





