पुणे : शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या सदाशिव पेठेतील मेडिकलची खिडकी तोडून गल्ल्यातील ६४ हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना १२ मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास भरत नाट्य मंदिराजवळील दीप कार्पोरेशन परिसरात घडली. याप्रकरणी महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १२ मे रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी तक्रारदारांच्या मेडिकलची खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला. गल्ल्यातील ६४ हजारांची रोकड चोरून नेली. दुसर्या दिवशी मेडिकल उघडण्यासाठी गेल्यानंतर महिलेला चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार गोंजारी करीत आहेत.