पुणे -महापालिकेच्या तब्बल 18 हजार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. मनपा मुख्यसभेने मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाच्या अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. तो तत्काळ मंजूर होणार असल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पुण्याच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात या सूचना देण्यात आल्या.